Junnar News : कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; दुष्काळाची चिंता वाढली

Pune junnar : पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे, विसापूर, चिल्हेवाडी, घोड या आठ धरणातुन पाणी नियोजन केलं जातं.
Kukdi Project
Kukdi Project Saam tv
Published On

जुन्नर (पुणे) : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने पाण्याची चिंता सर्वत्र लागून आहे. दरम्यान कुकडी प्रकल्पातील (Kukadi Canal) आठ धरणांत असलेल्या पाणी पातळीत विक्रमी घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत (Pune) आतापर्यत १९ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट होऊन सरासरी ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. (Tajya Batmya)

Kukdi Project
Nandurbar : मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरण; तिघांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार रुपयांचा दंड

पुणे आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे, विसापूर, चिल्हेवाडी, घोड या आठ धरणातुन पाणी नियोजन केलं जातं. मात्र यंदाच्या वर्षी पावसाच्या धरसोडीमुळे पाणी टंचाईची समस्या लवकर निर्माण झाल्याने डिंसेबरपासुनच कुकडी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग कालव्यातुन सुरु झाला. त्यातच वातावरणातील तापमानमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kukdi Project
Akola Crime : अकोटमध्ये 'सुपर शॉपी' फोडले; अवघ्या १६ मिनिटांत गल्ल्यातील रोकड घेऊन फरार, चोरटे सीसीटीव्हीत कैद

चिंता वाढली 

पाण्याची पातळी कमी होत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी नियोजन व्यवस्थित व्हायला हवं अन्यथा पुढील काळात मोठ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. आजच्या स्थितीला कुकडी प्रकल्पातील आठ धरणांचा पाणीसाठा
येडगाव : ६१.१८, माणिकडोह : ३९.७७, वडज : ७३.२२, पिंपळगाव जोगे : ५२.०५, डिंभे : ६७.८४, विसापूर : ४३.३२, चिल्हेवाडी : ८०.५३, घोड ६८.८५ इतका शिल्लक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com