Jalgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News : डंपरची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू

Jalgaon News : अपघाताची माहिती पोलिसांना आणि मयताच्या नातेवाइकांना कळवण्यात येऊन तसेच खासगी वाहनाने मृतदेह जळगाव जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळके (ता. जळगाव) येथून नाचणखेडा येथे जात असताना पळासखेडा गावाजवळ डंपरने दिलेल्या (Jalgaon) धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत (Accident) अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

जळगाव तालुक्यातील जळके- विटनेर येथील किराणा दुकानदार कमलाकर मोतीराम पाटील (वय ६४) हे नाचणखेडा येथे वास्तव्यास आहेत. दशक्रिया विधीसाठी कमलाकर पाटील हे दुचाकीने निघाले असताना पळासखेडा (मिराचे) गावाजवळ आले असता समोरून येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यात कमलाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक डंपर सोडून पसार झाला. अपघाताची माहिती पोलिसांना (Police) आणि मयताच्या नातेवाइकांना कळवण्यात येऊन तसेच खासगी वाहनाने मृतदेह जळगाव जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डंपर सोडून चालक पसार
अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. गर्दी जमत असल्याचे पाहून वाळूने भरलेलं डंपर सोडून चालकाने पळ काढला. पळासखेडा पोलिस पाटील प्रकाश बिचारे यांनी त्या डंपरची चावी काढून घेत ताब्यात घेवुन ते घरी निघून गेले. थोड्या वेळाने डंपरमधील वाळू खाली करून नंतर अपघाताला कारणीभूत डंपरही जागेवरून गायब झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT