Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv

Jalgaon Crime : सुवर्ण बाजारातील दुकान फोडले; १४ लाखाचा मुद्देमाल लांबविला

Jalgaon News : जळगाव शहरातील मारोतीपेठ परिसरातील सीताराम प्लाझामध्ये श्री अलंकार आणि पॉलिश सेंटर हि दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गेट आणि चॅनेल गेटचे कुलूप कापून फोडली.
Published on

जळगाव : जळगाव शहरातील सराफ बाजार परिसरातील दोन दुकाने फोडून १४ लाख ५९ लाख रुपयांचे सोन्याचे साहित्य (Jalgaon) चोरट्यानी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Jalgaon Crime
Beed News : माजलगावात गावठी पिस्टलसह तरुणास अटक; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव शहरातील मारोतीपेठ परिसरातील सीताराम प्लाझामध्ये श्री अलंकार आणि पॉलिश सेंटर हि दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गेट आणि चॅनेल गेटचे कुलूप कापून फोडली. (Crime News) अज्ञातांनी २५ व २६ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास लोखंडी गेट आणि चॅनेल गेटचे कुलूप कापले. दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले २५१. ७८० ग्राम वजनाचे (Gold) सोन्याचे रॉ मटेरियल असे एकूण १४ लाख ५९ हजार ५२४ रुपयांचे चोरटयांनी चोरून नेले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Crime
Electric Shock : महावितरणच्या कंत्राटी यंत्र चालकाचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी भेट देत पंचनामा केला. सचिन सोनार यांनी याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उप निरीक्षक प्रिया दातीर तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com