Parbhani News
Parbhani NewsSaam tv

Parbhani News : आधार कार्ड अभावी रखडले साडेचार हजार शेतकऱ्यांचे अनुदान

Parbhani News : परभणीच्या सेलू तालुक्यात गतवर्षी सततच्या पावसामुळे पाच महसूल मंडळातील खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

परभणी : सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून शासनाकडून निधी मंजूर करण्यात (Farmer) आला होता. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता. याकरिता केवायसी आवश्यक होती. अशाच प्रकारे आधारकार्ड लिंक नसलेल्या परभणी (Parbhani) जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. (Latest Marathi News)

Parbhani News
Ban On Onion Export : कांदा गडगडला ! शेतक-यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडला

परभणीच्या सेलू तालुक्यात गतवर्षी सततच्या पावसामुळे पाच महसूल मंडळातील खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी निधी ही मंजूर करण्यात आला होता. परंतु, अद्यापही सव्वासात हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी व आधार कार्ड न दिल्याने त्यांचे अनुदान बँक खात्यात जमा होऊ शकले नाही. शेतकऱ्यांना अनेकदा आवाहन केल्यानंतर देखील इ केवायसी केली नसल्याने अनुदान रखडले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani News
Buldhana News : तूर उत्पादनात प्रचंड घट; उत्पादन खर्चही निघणे कठीण

पोर्टल होणार बंद 

येत्या एक- दोन दिवसात ई पंचनामा पोर्टल बंद होणार असल्याने आधार कार्ड न दिलेल्या सव्वाचार हजार हजार शेतकऱ्यांचे शासकीय अनुदान रखडले आहे. यामुळे येत्या १-२ दिवसात शेतकऱ्यांनी इ केवायसी व आधारकार्ड देणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com