Ban On Onion Export : कांदा गडगडला ! शेतक-यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडला

सरकारने कांदा निर्यातबंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला
farmers demand to lift onion export ban lasalgaon bazar samiti
farmers demand to lift onion export ban lasalgaon bazar samitisaam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik News :

कांदा निर्यातबंदी (Ban On Onion Export) उठवावी अशी मागणी करत आज (साेमवार) लासलगाव बाजार समितीत (lasalgaon bazar samiti) शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडला. यावेळी शेतक-यांनी केंद्र सरकराचा निषेध नाेंदवला. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केली.(Maharashtra News)

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात कांद्याचे दर सातत्याने कोसळू लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचा 1600-1800 रुपये सरासरी दर कमी होऊन तो 900 ते 1000 रुपयांवर आला आहे.

farmers demand to lift onion export ban lasalgaon bazar samiti
OBC Jan Morcha : छगन भुजबळ राजीनामा देतील आम्हांला खात्री आहे : डॉ.बी. डी.चव्हाण

सातत्याने भाव काेसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. आजही लासलगाव बाजार समितीत कांद्याचा दर क्विंटलला 1000 रुपयांवर आला. यामुळे शेतकरी संतप्त झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडला. शेतकरी संघटनेने केंद्र सरकारचा निषेध नाेंदविला. सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

farmers demand to lift onion export ban lasalgaon bazar samiti
APMC Market Vashi : 'वेंगुर्ले हापूस' मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल : आंबा बागायतदारांना विश्वास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com