- विनाेद जिरे / राजेश काटकर / संदीप नांगरे
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांच्या लढ्याला यश आले. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा (maratha aarakshan) अध्यादेश जारी केला. यामुळे आम्हांला आनंद झाला असून सरकारचे आभार मानत बीड (beed), हिंगाेली (hingoli), परभणीसह (parbhani) राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मराठा समाज गुलालाची उधळण करु लागला आहे. आज ख-या अर्थाने मराठा समाज प्रजासत्ताक झाल्याची भावना मराठा समाजातील नेत्यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (Maharashtra News)
परभणीत दिवाळी
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या आनंदात आज फटाके, बॅड वाजवून आणि गुलाल उधळून मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी गावातून मिरवणूक काढली. आज जिल्हाभरात पुन्हा एकदा दिवाळी सारखी स्थिती दिसून येत आहे. सर्वांनी घरावर दिवे आणि गुढी उभारण्यासाठी खेड्यापाड्यात आवाहन करण्यात आले आहे.
हिंगाेलीत दूधाचे वाटप
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्याने हिंगोलीतील गांधी चौकात मराठा समाजातील दूध विक्रेत्यांनी चक्क विक्रीला आणलेले दूध नागरिकांना माेफत वाटत आनंदाेत्सव साजरा केला. यावेळी हजारो लिटर दुधाचे वाटप करत मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पेढे वाटून बीडवासियांनी मानले जरांगेसह मुख्यमंत्र्यांचे आभार
बीड शहरात मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फाेडण्यात आले. मराठा समाजातील नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण केली.
यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत, मराठा बांधवांना पेढे भरवत जल्लोष केला आहे. दरम्यान मराठा समाज आज खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली आहे.
त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम्ही मराठा बांधवांच्या वतीने आभार मानतो अशा भावना यावेळी मराठा बांधवांनी व्यक्त केल्या.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.