Dr. Nanasaheb Thorat, Satara, Khatav Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : मराठी माणूस कुठेच मागे नाही : डॉ. नानासाहेब थोरात

‘कोविडनंतरचे ग्रामीण भागातील आरोग्य आणि शैक्षणिक चळवळ’ या विषयावरील व्याख्यानात डाॅ. थाेरात बाेलत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

Satara News : मराठी माणूस कुठेच मागे नाही. महाराष्ट्र आपल्या देशाचा युरोप, अमेरिका आहे. महाराष्ट्राएवढे प्रगत, प्रगतिशील वैचारिक बैठक असणार दुसरे राज्य देशात नाही. महाराष्ट्राला वैचारिक बैठकीचे धोरणकर्ते मिळाल्यामुळे शिक्षण, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात प्रगत आहे. मात्र, कोरोनानंतर संपूर्ण जग बदलले असून, शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात (Dr. Nanasaheb Thorat) यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव येथे केले.

माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘कोविडनंतरचे ग्रामीण भागातील आरोग्य आणि शैक्षणिक चळवळ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. (Satara Latest Marathi News)

डॉ. थोरात म्हणाले, ‘‘शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योग्य धोरण राबवल्यास भविष्यामध्ये कोरोनासारख्या भयंकर संकटाचा आपण सामना करू शकतो. त्यामुळे सरकारने दोन्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी. कोरोना काळात अनेक युरोपीय देशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शाळा सुरू ठेवल्या होत्या. मात्र, भारतात शाळा बंद होत्या. परिणामी भारतातील मुले सामाजिक ज्ञानात दोन वर्षे मागे राहिली. हा अनुशेष भरून काढणे अवघड आहे. (dr. nanasaheb thorat latest marathi news)

कोरोनानंतर भारतात औषधांचा अतिवापर सुरू झाल्यामुळे शरीरात रोज जास्त प्रमाणात विविध प्रकारची औषधे जात आहेत. कुठलेच औषध किंवा आहार परिपूर्ण नसतो. गरज संतुलित आहाराची असते. ९० टक्के आजार मानसिकता आणि आहारातून होतात. त्यामुळे काय खावे किंवा काय खाऊ नये, हे वैज्ञानिक भाषेत नागरिकांपर्यंत पोचवले पाहिजे.’’

मराठी माणूस कुठेच मागे नाही. महाराष्ट्र (maharashtra) आपल्या देशाचा युरोप, अमेरिका आहे. महाराष्ट्राएवढे प्रगत, प्रगतिशील वैचारिक बैठक असणार दुसरे राज्य देशात नाही. महाराष्ट्राला वैचारिक बैठकीचे धोरणकर्ते मिळाल्यामुळे शिक्षण, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात प्रगत आहे. मात्र, कोरोनानंतर संपूर्ण जग बदलले असून, शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी विधाते यांनी एम. आर. शिंदे यांचे विचार मार्गदर्शक असल्याचे सांगितले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाजीम मुल्ला, गणेश बर्गे, ध्रुव लावंड, नेहा मदने, अमजद पठाण, अक्षय भोसले, विशाल बागल, नितीन सावंत यांचा सन्मान करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या मोहन शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.

पत्रकार अविनाश कदम यांनी प्रास्ताविक केले. तेजपाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. जलमित्र प्रकाश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास जीवन इंगळे, भूजलतज्ज्ञ विलास भोसले, बाबासाहेब इनामदार, संजय शहा, मोहन घाडगे, महेश देशमुख, विजयराव बोर्गे, अमीन आगा, ॲड. एम. ए. काझी, मनोज देशमुख, एकनाथ चव्हाण, रमेश अडसूळ, अनूप शिंदे, परशुराम बनकर, किशोर कुदळे,किरण राऊत,मनोज शिंदे, राजेंद्र काळे, ग्रामस्थ उपस्थित होते. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

Shruti Marathe: मोकळे केस अन् गालावरची गोंडस खळी...

SCROLL FOR NEXT