Gondawale Fire News : गाेंदवल्यात फर्निचरच्या शाेरुमला भीषण आग; लाखाेंचे साहित्य जळून खाक

अग्निशामक यंत्रणा मात्र वेळेवर पोचू शकली नव्हती.
satara news, gondawale, fire
satara news, gondawale, firesaam tv

Gondawale Fire News : लक्ष्मीपूजनाच्या दुस-या दिवशी सातारा जिल्ह्यात गाेंदवले गावात घडलेल्या दुर्घटनेत एक फर्निचरच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Satara Breaking News)

या घटनेबाबतची प्राथमिक माहिती अशी - सातारा लातूर महामार्गानजीक संतोषी स्टील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक हे शाेरुम आहे. या शाेरुमला आज (मंगळवार) पहाटे साडेतीनच्या सुमाराला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

satara news, gondawale, fire
Diwali Holiday : शिक्षक संघटनेच्या मागणीस मिळाले यश; दिवाळी सुट्टीचे दिवस वाढले

या शाेरुमच्या शेजारी राहत असलेल्या नवले यांना ही बाब लक्षात आली. दौलत नवले यांनी शाेरुमचे मालक नामदेव भिंगारे यांना बोलावून घेतले. शाेरुमचे शटर उघडल्यानंतर समोरील भागात भीषण आग (fire) लागल्याचे दिसले.

satara news, gondawale, fire
Diwali 2022 : नरकासुराचे दहनानंतर काेकणवासीयांनी तुळशीवृदांवना समोर फाेडलं 'कारिट'

ग्रामस्थांच्या आरडाओरड्याने परिसरातील इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शाेरुम शेजारील हातपंपाचे पाणी उपसून लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे गावातून ग्रामपंचायत (grampanchayat) सदस्य गुरुदत्त कुलकर्णी यांना फोन करून त्यांचा पाण्याचा खाजगी टँकर बोलाविण्यात आला .त्यानंतर बऱ्याच वेळाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. (Maharashtra News)

satara news, gondawale, fire
Politics : भाजप आमदारावर अखदलपात्र गुन्हा दाखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फाेन, वाद मिटणार ?

या आगीत शाेरुममधील विद्युत इन्व्हर्टरसाठीच्या बॅटऱ्या फुटल्या. तसेच इतर फर्निचर व माल जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग लागल्याचे समजताच दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक यंत्रणा मात्र वेळेवर पोचू शकली नव्हती. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com