WhatsApp Down: व्हॉट्सअॅपची सेवा दोन तासानंतर सुरू, युजर्सना दिलासा!

ट्विटरवरही व्हॉट्सअॅप डाऊन होत असल्याच्या तक्रारी लोक करत आहेत.
WhatsApp
WhatsAppSaam Tv

WhatsApp Down : मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झाले होते. मात्र जवळपास दोन तासांनंतर ही सेवा पूर्ववत झाली आहे. कोट्यवधी यूजर्सना मेसेज पाठवण्यात आणि रिसिव्ह करण्यात समस्या येत होत्या. ट्विटरवरही व्हॉट्सअॅप डाऊन होत असल्याच्या तक्रारी लोक करत होते.

WhatsApp
CM Eknath Shinde: आमदार नाराज आहेत का? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेसेज पाठवण्यात यूजर्सना अडचणी येत होत्या. कोट्यवधी लोक यामुळे प्रभावित झाले होते. व्हॉट्सअपवर येत असलेल्या समस्यांबद्दल Downdetectorने देखील रिपोर्ट केलं होतं.  (Maharashtra News)

WhatsApp
NCP : चर्चा तर हाेणारच ! कार्यकर्त्याला खुर्चीत बसवून खूद्द शरद पवार राहिले उभे, काढला फाेटाे (पाहा व्हिडिओ)

मागील वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने WhatsApp ची सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा WhatsApp डाऊन झाले होते. WhatsApp चा सर्व्हर क्रॅश झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत होता. व्हॉट्सअॅप डाउन झाल्याने युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात येत होता.

मेटाच्या प्रवक्त्यांनी याबाबत म्हटलं की, व्हॉट्सअॅप यूजर्सना मेसेज पाठवण्याता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. व्हॉट्सअॅपची सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com