Sharad Pawar News : वयाच्या ऐशिंव्या वर्षात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साता-याच्या सभेत भर पावसात उभं राहून केलेले भाषण कार्यकर्त्यांना बळ देऊन गेलं हाेते. पवार यांच्या साता-यातील (satara) भाषणास नुकतेच तीन वर्ष पुर्ण झाले आहे. काेणत्या कार्यकर्त्याला प्राेत्साहन द्यायचे, त्यांचा कसा सन्मान राखायचा हे पवार यांच्या कृतीतून अनेकदा समाेर आलं आहे. साेमवारी एका कार्यक्रमात पवार (sharad pawar) यांनी कार्यकर्त्यांच्या एका सूचनेवरुन मी काय म्हतारा झालाे आहे का असं म्हटलं हाेते. त्यानंतर दुस-या कार्यक्रमात पुरंदर (purandar) तालुकाध्यक्षला स्वत: खूर्चीत बसवून त्याच्या शेजारी उभं राहणं पसंत केले. पवार यांनी कार्यकर्त्याचा सन्मान केलाच परंतु मी अजूनही म्हातारा झालेलाे नाही हे त्यांच्या कृतीतून अधाेरेखित केल्याची चर्चा समाज माध्यमात आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)
शरद पवार साेमवारी पुरंदर तालुका दौऱ्यावर होते. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या. गावोगावी फिरू नका अशी विनंती वजा सूचना केली होती. त्यावर पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेत तुम्हाला कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय असं म्हटलं. (Maharashtra News)
दरम्यान त्या कार्यक्रमानंतर शरद पवार हे काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत पुरंदर (purandar) तालुका युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव (Pushkraj Jadhav) यांच्या कार्यालयास भेट देण्यासाठी गेले. तेथे तालुकाध्यक्षांनी त्यांना खूर्चीवर बसवून त्यांचे स्वागत करण्यासाठी शाल देण्याच्या तयारीत असतानाच पवार यांनी जाधव यांच्या खांद्याला, दंडाला पकडत जाधव यांनाच खूर्चीत बसविलं. हा सारा प्रकार पाहून उपस्थितांना देखील खूप आनंद झाला.
इतेकच नव्हे तर शरद पवार यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत खूर्चीत बसलेल्या जाधव यांच्या शेजारी उभे राहून छायाचित्र काढलं. पवार यांनी केलेल्या सन्मानामुळे जाधव यांच्या डाेळ्यातून अश्रु आेघळले. शरद पवार यांच्या कृतीतून नेता कार्यकर्त्यावर किती प्रेम करताे, त्याचा कसा आदर राखताे हे पुन्हा एकदा समाेर आलं आहे. (Breaking Marathi News)
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ट्विट करुन घडलेला किस्सा जनतेपर्यंत पाेहचविला आहे. ते लिहितात पुरंदर तालुक्याचे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव हे आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांना कार्यालय भेटीला घेऊन आले ! व खुर्चीवर बसण्याची विनंती केली. साहेब म्हणाले 'ऑफिस तुमचं, खुर्ची तुमची' स्वतः ऊभे राहिले व त्यांना स्वतः सन्मानाने बसवले. पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान फक्त साहेबच करू शकतात.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.