- संजय जाधव, भारत नागणे, सचिन बनसाेडे
Solar Eclipse 2022 : राज्यातील विविध मंदिरात आज (मंगळवार) खंडग्रास सूर्यग्रहणामुळे दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. शिर्डी (shirdi), शेगाव (shegoan), पंढरपूर (pandharpur) येथील मंदिरात भाविकांसाठी काही काळ देव देवतांचे दर्शन बंद राहणार असल्याची माहिती तेथील व्यवस्थापनाने दिली आहे. (Surya Grahan Latest Marathi News)
साई समाधीचे जवळून दर्शन बंद
शिर्डी येथील साई समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. खंडग्रास सूर्यग्रहणामुळे आज दैनंदिन कार्यक्रमात बदल केल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. आज दुपारी चार वाजून ४० मिनिटे ते सायंकाळी सहा वाजून ३१ मिनिटांपर्यंत भाविकांना साई समाधीचे जवळून दर्शन बंद राहाणार आहे.
दरम्यानच्या काळात साईबाबांच्या मूर्तीसमोर मंत्रोच्चार होणार आहेत. समाधी मंदिराच्या सभामंडपातून साई भक्तांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी सहा वाजून ५५ मिनीटांनी शिर्डी माझे पंढरपूर आणि सायंकाळी सव्वा सात वाजता धुपारती संपन्न हाेईल. त्यानंतर भाविकांच्या दर्शनरांगा पूर्ववत सुरू केल्या जातील अशी माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
शेगावचे गजानन महाराज मंदिर खूल राहणार
आज दुपारी चार वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण पाच वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. आज सूर्यग्रहण असले तरी शेगावच (shegoan) संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी खुल राहणार आहे. जाळीतून भक्तांना दर्शन घेता येईल अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
आज पहाटे ग्रहणाचे वेध लागले असल्याने पहाटेची काकडा आरती झाली नाही. दुपारची पूजा , षोडशोपचार पूजा , माध्याणांची आरती होणार नसल्याचे संत गजानन महाराज संस्थांनाच्या वतीने सांगण्यात आले. दिवाळी नंतर सलग सुट्या असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात मोठी उपाययोजना करण्यात आली आहे.
विठुरायाला सुक्या मेव्याचा नैवद्य
आज खंडग्रास ग्रहण असल्याने पंढरपूरातील (pandharpur) विठ्ठल रुक्मिणीला दिवसभरात फक्त सुक्या मेव्याचा नैवद्य दाखवला जाणार आहे. दरम्यान दर्शन व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आला नाही अशी माहिती व्यवस्थापनाने दिली आहे. (Breaking Marathi News)
आज सायंकाळी ग्रहण सुरू होणार आहे. यावेळी चंद्रभागेच्या पाण्याने देवाला स्नान घालण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सहा वाजता ग्रहण मोक्ष होणार आहे. त्यानंतर पुन्हा देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाईल. त्यानंतर पोशाख करून नवैद्य दाखवण्यात येणार आहे. स्नानानंतर धुपारती होईल असे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.