Dhananjay Munde and pankaja munde Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : धनुभाऊंमुळे पंकजाताईंच्या मंत्रिपदाला सुरुंग? अंजली दमानियांच्या दाव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Dhananjay Munde and pankaja munde : धनंजय मुंडेंकडूनच पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाला सुरुंग लावण्याची रणनीती आखल्याचा गौप्यस्फोट दमानियांनी केलाय.. मात्र पंकजा मुंडेंबाबत कोणते पुरावे मुंडे दमानियांकडे घेऊन गेले होते? आणि धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंची कशी कोंडी केली होती? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

बीडच्या राजकारणात पंकजा आणि धनंजय मुंडे हे बंधू भगिनी12 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. मात्र धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाचा घोटाळा काढताना अंजली दमानियांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय..पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाला सुरुंग लावण्यासाठी धनंजय मुंडे, राजेंद्र घनवट आणि तेजस ठक्कर घोटाळ्याची फाईल घेऊन आपल्याकडे आल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय.

2014 मध्ये राज्यात महायुतीचं सरकार असताना पंकजा मुंडेंकडे ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला व बालकल्याण मंत्रिपद देण्यात आलं... मात्र अवघ्या वर्षभरातच पंकजा मुंडेंवर घोटाळ्यांच्या आरोपांचं सत्र सुरु झालं.. पंकजा मुंडेंवर कोणत्या घोटाळ्यांचे आरोप झाले? पाहूयात...

पंकजांविरोधात आरोपांचं सत्रं

जून 2015

पंकजा मुंडेंवर चिक्की खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप

2016

टेक होम रेशन योजनेत 7200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

2024

पंकजा मुंडेंशी संबंधित वैद्यनाथ साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

2013 मध्ये धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंवर आरोप करत भाजप सोडली... त्यानंतर धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते.. त्यावेळी मुंडेंनी पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप केले होत..

(30 जुलै 2015)

चिक्की घोटाळ्याच्या चौकशीनंतर पंकजा मुंडेंना क्लीन चिट मिळाली खरी पण त्यानंतर झालेल्या घोटाळ्यांमागे आणि पंकजा मुंडेंचं जलसंधारणचं मंत्रिपद जाण्यामागे धनंजय मुंडे होते का? याची चर्चा दमानियांच्या आरोपांनी पुन्हा सुरु झालीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT