नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Collector’s Dance Sparks: धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजांच्या डान्स व्हिडिओमुळे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले आहे.

धाराशिव: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी तुळजापूरमधील सांस्कृतिक महोत्सवात डान्स केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धाराशिवमध्ये शेतकरी संघटनेने जोरदार निदर्शन केले आहे. जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक खुर्चीला हार घालून पूजा करून आपला रोष व्यक्त केला.

आंदोलनात सहभागी शेतकरी कार्यकर्त्यांनी म्हटले की, जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीसारख्या संकटाच्या काळात डान्स करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने चेतावणी दिली की, जर जिल्हाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारून जीव देऊ. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

अतिवृष्टीमुळे धारशिवमध्ये बळिराजाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेय. सर्व नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदतीचे आश्वासन देत आहे. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स करतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com