Pankaja Munde: 'धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता', राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Pankaja Munde: धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पकंजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायला नको होतं. राजीनामा आधीच द्यायला हवा होता'. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde NewsSaam tv
Published On

कॅबिनेट मंत्री धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केलाय. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाशवी हत्येच्या अमानुष फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. छायाचित्र व्हायरल होताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीनं जोर धरला होता. अशातच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पकंजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती', अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

'धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती. तर, कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं', असं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde
Swargate bus depot: स्वारगेटप्रकरणातील मोठी अपडेट! तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला, पीडितेनं सांगितली सर्व आपबीती

फोटो बघायची हिम्मत होत नाही..

'मुंबईत काय चाललंय, हे नागपूरमध्ये माहिती नव्हतं. इन्सटाग्रामची पोस्ट बघून मुंबईत काय चाललंय याची माहिती मिळाली.

संतोष देशमुख प्रकरणातील काही छायाचित्र सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाले. ते फोटो किंवा व्हिडिओ उघडून बघायची हिम्मत नाही झाली. यामध्ये कुणाचा हात आहे, कोण सहभागी आहे, हे यंत्रणेलाच माहित आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Dhananjay Munde: मुंडेंच्या राजीनाम्याची कहाणी! अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडेंची राजीनाम्याची पोस्ट

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. वैद्यकिय कारणास्तव त्यांनी मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com