Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये भयंकर पूरस्थिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह मंत्र्यांचा पूरग्रस्त भागात दौरा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील पूरस्थिती अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Nagpur: नगरसेवक पदाचे तिकीट हवे असेल तर पदवीधर निवडणुकीसाठी हजार मतदारांची नोंदणी अनिवार्य 

नागपूर

- नगरसेवक पदाचे तिकीट हवे असेल तर पदवीधर निवडणुकीसाठी हजार मतदारांची नोंदणी अनिवार्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इच्छुक उमेदवारांना टार्गेट

- पदवीधरचा गड परत मिळवण्यासाठी भाजपकडून निवडणुकीच्या सव्वा वर्षापूर्वीपासूनच जोरदार तयारी

- काल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नागपूर विभागीय कार्यकर्त्यांची झाली बैठक

Pandharpur:  पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूर -

पूर ओसरायला सुरुवात होताच पुन्हा सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अतिवृष्टीचा अंदाज असल्याने सीना नदीला पुन्हा पुराचा धोका

अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पुन्हा पाणी सुटणार

Ratnagiri: रत्नागिरीतील कुर्णे येथील राखीव जंगलातून साग झाडाची चोरी

रत्नागिरी - लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव जंगलातून साग झाडाची चोरी

राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील सात जणांना वनविभागाने घेतले ताब्यात

सागाचे ३१ ओणके वनविभागाकडून करण्यात आले जप्त

२८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक क्रेन देखिल वनविभाच्या ताब्यात

Nagpur:  नागपूर विमानतळावरून ८ महिन्यांत ३०९ उड्डाण रद्द, ३,८३२ विमानांना झाला विलंब

नागपूर

- नागपूर विमानतळावरून ८ महिन्यांत ३०९ उड्डाण रद्द, ३,८३२ विमानांना झाला विलंब

- यावर्षी ८ आपत्कालीन लँडिंग, तर २०२२ ते २०२५ दरम्यान एकूण ३८ विमानांना आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

- १ जानेवारी ते ३१ ऑगस्टदरम्यान १९.३७ लाख प्रवाशांची आवागमन नोंदवण्यात आलीय...

- विमानतळाला लँडिंग, पार्किंग, यूडीएफ मधून ८,७८०.१२ लाख महसूल, तर खर्च २,४९४.३७ लाख.

- खासगी १,१८६ विमान व १७८ हेलिकॉप्टर उड्डाणांमधून ७७ लाख महसूल मिळाला.

- प्रवासी संख्या कमी असल्याने कोल्हापूर, लखनौ, बेळगाव, नाशिक, चेन्नई, नांदेड व छत्रपती संभाजीनगर विमानसेवा बंद करण्यात आल्या.

Nashik: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

नाशिक -

- २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

- इंदूरमार्गे जयपूर फ्लाइट पुन्हा कनेक्ट, इंडिगो एअरलाईन्सकडून विमानसेवा उपलब्ध

- विमानसेवेसाठी ७८ आसनी एटीआर विमानांचा वापर

- तिकिटाचे दर व वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

- नाशिकमधील औद्योगिक संघटनांच्या मागणीनंतर निर्णय

Pune: पुण्यात रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे -

रात्रीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल चंदनशिवे याला सापळा रचून गुन्हे शाखा चार च्या पथकाने केली अटक

त्याच्याकडून जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी केला हस्तगत

खराडी भागातून आरोपीला अटक केली असून त्याने या आधी ही अनेक ठिकाणी घरफोड्या केलेल्या असल्याची माहिती

गेल्या काही दिवसापसून पुण्यात घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com