MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Pune News : महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलून आता ९ नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जवळपास १.७५ लाख विद्यार्थी या परीक्षेत बसणार आहेत. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा
MPSC Exam 2025 Date Saam Tv
Published On
Summary
  • २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार आहे.

  • पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

  • १.७५ लाख विद्यार्थी ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

  • विद्यार्थ्यांच्या मागणीची सरकारने पूर्तता केली आहे.

महाराष्ट्रातील परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जनशक्ती संघटनेने केली होती, दरम्यान या मागणीची पुर्तता झाली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार होती मात्र आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात मात्र अतिवृष्टीमुळे सर्वत्र नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली. तसेच अनेक गावांचा संपर्कही तुटला. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची ओढाताण झालेली पाहायला मिळाली. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

शिवाय २६ ते २८ सप्टेंबरला हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. साधारणपणे जास्तीत जास्त १ ते २ आठवडे परीक्षा पुढे ढकलून पूरस्थिती पूर्वपदावर येताच परीक्षा घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती. शासनाकडून या मागणीची पूर्तता करण्यात आली आहे.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा
Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

दरम्यान २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जवळपास एक लाख ७५ हजार ५१६ विध्यार्थी देणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. विध्यार्थ्यांच्या मानसिकतेचा व राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी ही मागणी पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आयोगाचे व सरकारचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com