Majalgaon BJP worker Babasaheb Age killed : बीडमध्ये रक्तरंजित थरार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये धारदार कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. भाजप कार्यकर्त्याला संपवल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. बीडच्या माजल गावातील भरवस्तीतील हत्येचा थरार घडला.
भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याने दोन दिवसांपूर्वीच मंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट भेट घेतली होती. बीडच्या माजलगाव शहरात भरदिवसा तरुणाची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाबासाहेब आगे अस मृत तरुणाच नाव आहे. हत्या करणारा आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नारायण शंकर फफाळ असं आरोपीचे नाव आहे.
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भरवस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मृत बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य होते. भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
आरोपी नारायण शंकर फपाळने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. त्यानंतर सपासप वार करून हत्या केली आहे. स्वतः आरोपी नारायण शंकर फफाळ हा माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्या केल्याची कबुली दिली. भाजप कार्यकर्त्याच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.