Shirpur Police : राजस्थानहून आलेला तरुण ताब्यात; चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर, चार पिस्तूल जप्त

Dhule news : शिरपूर फाटा परिसरात एक तरुण गावठी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती
Shirpur Police
Shirpur PoliceSaam tv
Published On

धुळे : राजस्थानमधील एक तरुण शिरपूरमध्ये गावठी पिस्तूल विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर शिरपूर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

शिरपूर फाटा परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या एका तरुणाला शिरपूर गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. उमेदसिंग भवाणसिंग राजपुत (वय २४) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान शिरपूर फाटा परिसरात एक तरुण गावठी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार आणि गुन्हे शोध पथकाने सापळा रचून उमेदसिंग राजपुत याला ताब्यात घेतले.  

Shirpur Police
Water Crisis : कोट्यवधींची योजना पाण्यात; लातूर जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या

सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे चार गावठी बनावटीचे पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. या जप्त केलेल्या पिस्तुल आणि काडतुसांची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिरपूर पोलीस करत आहेत.

Shirpur Police
Education Department Scam : बनावट कागदपत्राद्वारे मुख्याध्यापक पदास मान्यता; नागपुरात पाच जणांना अटक

पिंपरी चिंचवडमध्ये नऊ किलो गांजा जप्त 

पिंपरी चिंचवड शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ९ किलो ४७८ ग्राम गांजा जप्त केला आहे. भरत दहशत वाघमारे हा चरोली येथील दाभाडे सरकार चौक या ठिकाणी आपल्या दुचाकीवर येऊन थांबला असून त्याच्याकडे एक पिशवी असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी भरत वाघमारे यांच्या ताब्यातून ९ किलो 478 ग्राम गांजा आणि दुचाकी वाहन जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com