Kedar Jadhav Joins BJP : क्रिकेटचं मैदान गाजवलं, आता राजकीय मैदानात एन्ट्री; केदार जाधवचा भाजप प्रवेश; २०२० मध्येच...

Kedar Jadhav Joins BJP news Update : मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवने भाजपमध्ये प्रवेश केला.
केदार जाधव भाजपमध्ये, क्रिकेटच्या मैदानानंतर राजकीय इनिंग सुरू
Kedar Jadhav Joins BJPsaam tv
Published On

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवनं राजकीय मैदानात उडी घेतली आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेतल्यानंतर केदार जाधवने राजकीय इनिंग सुरू केली आहे. मुंबईतील प्रवेश सोहळ्यात केदारने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदारनं भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं.

पक्षप्रवेश सोहळ्यात केदार जाधव यानं भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केदार जाधव याचं पक्षात स्वागत केलं. केदार जाधवनं भारतीय क्रिकेटसह आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. केदार जाधव यानं गेल्या वर्षी जूनमध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून संन्यास घेतला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं ही महत्वाची घोषणा केली होती.

३९ वर्षीय केदार जाधव ८ फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. या मालिकेत केदार जाधवला अवघ्या दोन सामन्यांत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण ३५ धावा केल्या होत्या.

२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात

केदार जाधव याने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १६ नोव्हेंबर २०१४ मध्ये रांचीत श्रीलंकेविरुद्ध तो पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने ७३ एकदिवसीय सामन्यांत ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या. त्यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्यासोबतच गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली होती. त्याने २७ विकेट्सही घेतल्या आहेत. टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ९ सामन्यांत १२३ च्या स्ट्राइक रेटने ५८ धावा केल्या आहेत.

केदार जाधव भाजपमध्ये, क्रिकेटच्या मैदानानंतर राजकीय इनिंग सुरू
BJP Politics : भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका; पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

आयपीएलमध्ये दमदार

भारतीय संघाकडून खेळताना केदार जाधवने दमदार कामगिरी केली. त्यानंतर आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जकडून तो बराच काळ खेळला. सनरायझर्स हैदराबादचंही त्यानं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलमध्ये केदार जाधव याने ९५ सामन्यांत १२३. १७ च्या स्ट्राइक रेटने ११९६ धावा केल्या आहेत. त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.

केदार जाधव भाजपमध्ये, क्रिकेटच्या मैदानानंतर राजकीय इनिंग सुरू
Karjat Politics: राम शिंदेंचा डाव,रोहित पवार चितपट; कर्जतमध्ये सत्तेला सुरुंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com