
अक्षय बडवे, साम टीव्ही
विदेशी पर्यटकासमोर महाराष्ट्राची मान शरमने खाली घालवणाऱ्या टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात सुरुवात झाली आहे. परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी टवाळखोरांचा शोध सुरु केला आहे.
परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. तरुणांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या टवाळखोरांचा शोध सुरु झाला आहे. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर टवाळखोरांनी शिव्या शिकवल्या होत्या. तरुणांच्या टवाळखोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ला सर करत असताना वाटेत काही तरुण भेटले. वाटेत भेटलेल्या तरुणांनी त्या परदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिव्या म्हणायला शिकवल्या. शिवीगाळ करत असताना काहीतरी चुकीचं बोलत आहे, असं पर्यटकाला वाटलं. त्यामुळे विदेशी पर्यटक तिथून निघून गेला होता.
या प्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. याबाबत आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून संबंधित तरुणांवर भारतीय न्याय संहिता कलम ४९, कलम ३०२ आणि कलम ३५१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमधील विदेशी पर्यटकाला सुरुवातीला तरुणांच्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. टवाळखोर पोरं विदेश पर्यटकाला शिव्या बोलायला सांगत होते. त्याचवेळी तरुण हसतही होते. यामुळे पर्यटकाला त्यांची गडबड समजली. पुढे विदेशी पर्यटकाने टवाळखोर पोरांच्या खेद व्यक्त केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा जाणार नसल्याचं म्हटलं. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून टवाळखोरांच्या कृत्यांवर टीका केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.