Beed Crime : आधी माय-लेकाचं अपहरण, नंतर बेदम मारहाण; बीडमधील खळबळजनक घटना

Beed Crime News : बीडमध्ये खळबळजनक घटना थांबता थांबेना. माय-लेकाचं अपहरण करून मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेला ४२ दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
Beed
Beed Crime NewsSaam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : बीडमध्ये गुन्हेगारी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. बीडच्या शिरूरमध्ये जुन्या वादातून तरुणाचे आईसह अपहरण करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. बीडच्या शिरुर पोलीस ठाण्यातील हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतरही आरोपी फरार असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

Beed
Pune CNG Price Hike : वाहनधारकांना महागाईचा झटका; सलग दुसऱ्या दिवशी CNG दरात वाढ, जाणून घ्या नवी किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या शिरूरमधील घाटशीळ पारगावमध्ये जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोघांचेही अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Beed
Ahmedabad Fire : अहमदाबादमध्ये अग्नितांडव; भीषण आगीनंतर लोकांनी इमारतीमधून मारल्या उड्या, थरकाप उडवणारा VIDEO

कृष्णा दादासाहेब घोडके असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आबे. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरारच आहेत. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

Beed
Dr babasaheb ambedkar : शालेय शिक्षण ते उच्चशिक्षण; बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण कुठे कुठे झाले?

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी कृष्णा घोडके या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. मारहाण करण्याऱ्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगेश तांबारे तरुणाला अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी उर्वरित तरुण फरार आहेत.

गुन्हा घडून ४२ दिवस झाले तरी प्रमुख आरोपींना अटक न केल्याने पीडित तरुणाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. आरोपींना अटक केली नाही, तर कुटुंबासहित उपोषणाला बसण्याचा इशारा पीडित तरुणाने दिला आहे. उपोषणानंतर होणाऱ्या परिणामाला कार्यालय जबाबदार राहील, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, अशी विनंती पीडित आरोपीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com