Vishal Gangurde
डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर जेमतेम दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले. ते ६ वर्षांचे असताना आईचे निधन झाले.
सामाजिक न्याय विभाग आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. पुढे डॉ.आंबेडकर यांचं शालेय शिक्षण सातारा येथे झालं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे एमए आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये डी.एससीची तयारी करण्यासही परवानगी मिळाली होती.
बाबासाहेबांनी बार-ऍट -लॉ आणि डी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतलं.