Vishal Gangurde
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची चौथी पिढी आता राजकारणात आहे.
भारतीय राजकारणात गांधी, नेहरू यांच्यासहित आंबेडकर आडनाव देखील प्रसिद्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४ एप्रिल १९०६ रोजी रमाई यांच्याशी भायखळ्यातील भाजी मार्केटमध्ये विवाह पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना पाच मुले होती. यशवंत आंबेडकर वगळता ४ मुले बालपणीच मरण पावली.
रमाई यांचं वयाच्या ३७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं.
रमाईंच्या निधनांतर बाबासाहेबांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे चाळीसच्या दशकात बाबासाहेबांची तब्येत ढासळू लागली.
मुंबईत डॉक्टर असलेल्या सविता यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर उपचार करून बरं केलं होतं. त्या ब्राह्मण कुटुंबातील होत्या.
तब्येत ढासळू लागल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४८ साली डॉ. सविता यांच्याशी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. सविता यांनी केलेल्या उपचारामुळे आयुष्य ८ ते १० वर्षांनी वाढल्याचं स्वत: आंबेडकर म्हणाले होते.
डॉ. सविता यांचा २००३ साली मुंबईत मृत्यू झाला होता. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सक्रिय सहभाग नोंदवला होता.