Marathi Youth Beaten: शिवाजी पार्कात परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी, मराठी मुलांना मारहाण VIDEO Viral

Mumbai Shivaji Park Viral video : मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मराठी मुलांना मारहाण केली गेली असल्याचं म्हटलं जात आहे.
Mumbai Shivaji Park
Mumbai Shivaji Park Viral video Saam Tv
Published On

दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कात एका फेरीवाल्याची मुजोरी पाहायला मिळाली. या परप्रांतीय फेरीवाल्याने मराठी तरुणांना मारहाण केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाजी पार्कात रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसांत क्रिकेटसह इतर अनेक प्रकारचे खेळ खेळणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी असते.

मात्र या छत्रपती शिवाजी पार्काला आता परप्रांतीय फेरीवाल्यांनी घेराव घातलाय. पार्कातील खेळाच्या मैदानात अनेक फेरीवाले मुजोरी करत धंदा करताना दिसत आहेत. अशाच एका परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुजोरपणाचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात काही फेरीवाले छत्रपती शिवाजी पार्क मैदानात खेळणाऱ्या तरुणांना माराहाण करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संबंधित फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केलीय. मात्र हा व्हिडिओ एका इस्टाग्रामवर पोस्टवर करण्यात आलाय. हा व्हिडिओ जुना असून तो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी पार्कात अशी घटना घडणे ही संतापजनक व्यक्त करत आहेत. छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसरात सध्या मोठ्याप्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढले आहेत.

Mumbai Shivaji Park
Viral Video: बापरे! विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; कपडे फाटेपर्यंत एकमेंकाना मारहाण; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

याबाबत वारंवार तक्रार करुनही त्यांच्यावर कोणतेही ठोस कारवाई होत नाही. त्याचदरम्यान फेरीवाल्याचा मुजोरी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता तरी कारवाई होईल असं म्हटलं जात आहे. व्हायरल व्हिडिओनुसार, खेळणारे तरुण आणि फेरीवाल्यामध्ये मारामारी झाली. त्यावेळी काही तरुणांनी त्यांचे भांडण रोखले. फेरीवाले मैदानाच्या आवारात फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांना रोखत होते, त्यावरून भांडण सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

Mumbai Shivaji Park
Viral Video: ट्रेनमध्ये दोन महिला भिडल्या; झिंज्या उपटल्या , कपडे फाडले तरी थांबल्या नाहीत, पाहा व्हायरल VIDEO

छत्रपती शिवाजी पार्कातील हा व्हिडिओ दादरमुंबईकर (dadarmumbaikar) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आलीय. काही मुलं छत्रपती शिवाजी पार्क मैदानात C3 भागात फुटबॉल खेळत होती. त्यावेळी तिथे अनधिकृतपणे पाणीपुरीचा स्टॉलवरील फेरीवल्यांनी मुलांना खेळण्यास मनाई केली. यावरुन फेरीवाला आणि मुलांमध्ये वाद झाला. वादाचं रुपांतर शेवटी हाणीमारीत झालं. यावेळी मुजोर फेरीवाल्यांनी मुलांना मारहाण केली. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com