Mumbai Local : सकाळची वेळ, रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी; धावती लोकल पकडताना तोल गेला, तरुणाने जीव गमावला

Mumbai Local news : धावती लोकल पकडताना तोल जाऊन तरुणाने जीव गमावला आहे. ३५ वर्षीय रोहितच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Local
Mumbai Local Saam tv
Published On

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी धावती लोकल पकडताना तरुणाचा अपघात झाल्याची घटना घडली होती. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध तरुण प्रवासी अडकला होता. अपघातात तरुण गंभीर जखमी होता. या घटनेनंतर प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, आज शनिवारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरुणाच्या मृत्यूने रेल्वे अपघातातील मृतांच्या संख्येत आणखी भर पडली आहे.

Local
Karuna Munde : 'मुंडे अन् गँग औरंगजेबापेक्षाही क्रूर'; करुणा मुंडेंचे गंभीर आरोप, पाहा स्पेशल रिपोर्ट

लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी धावती लोकल पकडणं अंबरनाथच्या एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. प्रवाशाचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलच्यामध्ये मधोमध अडकला होता. यात हा प्रवासी गंभीर जखमी झाला होता. अखेर या रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या प्रवाशाचं नाव रोहित बच्चूलाल यादव असे आहे. रोहित हा 35 वर्षांचा होता.

Local
Solapur Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींपर्यंत विषय जाणार

उल्हासनगरच्या सिताराम नगर येथे राहण्यास होता. नोकरीला जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकात सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सीएसएमटीसाठी रोहित धावत्या लोकलमध्ये चढायला गेला. मात्र लोकल वेगात असल्याने त्याचा तोल गेला. लोकलमध्ये चढता न आल्याने तो घसरून थेट प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये जाऊन पडला. त्यानंतर त्याच्यावरून २ ते ३ डबे पुढे गेले. या अपघातात रोहित गंभीर जखमी झाला.

Local
Viral Video : ती किंचाळली अन् त्याचा प्लान फसला; गर्लफ्रेंडला सुटकेसमधून हॉस्टेलवर नेताना बॉयफ्रेंड अडकला, नेमकं काय घडलं?

रोहितला आरपीएफने बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र अखेर त्याचा आज मृत्यू झाला. लोकल ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवासी करत असलेली घाई कशी जीवावर बेतू शकते, हे या निमित्ताने पुढे आलं आहे. रोहितच्या मृत्यूने उल्हासनगरमधील सितारामनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com