Indira Meena: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून राजकारण; काँग्रेस आमदाराकडून भाजप नेत्याला मारहाण, कपडे फाडले, VIDEO
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बौंली गावात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या श्रेयवादावरून राडा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या श्रेयवादावरून काँग्रेस आणि भाजपचे नेते भिडले. काँग्रेस आमदार इंदिरा मीणा आणि भाजप नेते प्रधान कृष्ण पोसवाल, हनुमत दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी असतानाही मोठा राडा झाल्याचे दिसून आलं.
काँग्रेस आमदार इंदिरा मीणा यांनी भाजप नेत्यांनी दारू पिऊन धिंगाणा केल्याचा आरोप केला. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दोन वर्षांपूर्वी अनावरण झाल्यानंतरही प्रतिमेखाली काल नेमप्लेट लावण्याच्या काँग्रेसच्या कृतीला भाजप नेत्यांनी चुकीचं ठरवलं. रागात संयम गमावून बसलेल्या काँग्रेस आमदार इंदिरा मीणा यांनी भाजप नेत्यांना मारहाण केली. त्यांनी भाजप नेत्याचे कपडे फाडले. इंदिरा मीणा रागात भाजप नेत्यांना भिडल्या. दोन्ही गटाच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं अनावरण झालं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवसाआधी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रतिमेखाली श्रेयाची नेमप्लेट लावण्यासाठी पोहोचले. काँग्रेसचे कार्यकर्ते प्रतिमेखाली आमदार इंदिरा मीणा आणि नपा अध्यक्ष कमलेश जोशी यांच्या नावाची प्लेट लावण्यासाठी पोहोचले. याची माहिती मिळाल्यानंतर प्रधान कृष्ण पोसवाल, भाजप मंडल अध्यक्ष हनुमत दीक्षित सहित त्यांचे अनेक समर्थक पोहोचले. भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टोकलं. यावरून दोन्ही गटात राडा झाला. यावेळी आमदार इंदिरा मीणा आमि मंडल अध्यक्ष हनुमत दीक्षित यांच्यात बाचाबाची झाली.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
काँग्रेस आमदार इंदिरा मीणा आणि भाजप मंडल अध्यक्ष हनुमत दीक्षित यांच्यावर वाद झाल्याचे दिसून येत आहे. मंडल अध्यक्ष दीक्षित हे त्यांच्या कारमध्ये होते. तर रागाने लाल झालेल्या इंदिरा मीणा यांनी भाजप नेत्यावर संताप व्यक्त केला. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर भाजप नेत्याचे कपडे फाडण्यात आले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते घटनास्थळी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.