Maharashtra Politics : भाजप खासदार उदयनराजे भोसलेंच्या 6 मागण्या; अमित शहांचं मौन, रायगडावर नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी अमित शाहांसमोर 6 मागण्या केल्या...या मागण्या काय आहेत? त्यावर अमित शाहांनी काय उत्तर दिलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
amit Shah News
amit Shah Saam tv
Published On

ठिकाण- रायगड

निमित्त- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम....

या कार्यक्रमासाठी आलेल्या अमित शाहांसमोरच छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी उदयनराजेंनी केलीय..

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची जणूकाही स्पर्धाच लागलीय... आधी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, त्यानंतर राहुल सोलापूरकर पुढे प्रशांत कोरटकर ही यादी मोठी आहे... त्यामुळेच छत्रपतींचा अवमान रोखण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबाबत उदयनराजेंनी अमित शाहांसमोर 6 मागण्या मांडल्या.

amit Shah News
National Herald Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; AJLची मालमत्ता घेणार ताब्यात

उदयनराजेंच्या मागण्या, शहांचं मौन

महापुरुषांच्या अवमानावर अजामीनपात्र गुन्ह्यासह 10 वर्षांच्या शिक्षेचा कायदा करा

छत्रपती शिवरायांचा शासनमान्य इतिहास प्रकाशित करा

सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करा

रामायण, बुद्धसर्किट प्रमाणे शिवस्वराज्य सर्किट निर्माण करा

छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक करावं

राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी शिवस्मारक करा

amit Shah News
Pune Sinhagad News : परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणे पडलं महागात; टवाळखोरांविरोधात पोलिसांत गुन्हा

उदयनराजेंनी अमित शाहांसमोर मागण्या केल्या खऱ्या.... पण या मागण्यांवर अमित शाहांनी सपशेल मौन बाळगलंय..तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मागण्यांच्या पूर्ततेचं आश्वासन दिलंय.

amit Shah News
Beed Crime : आधी माय-लेकाचं अपहरण, नंतर बेदम मारहाण; बीडमधील खळबळजनक घटना

उदयनराजेंनी याआधीही छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी केली होती.. उदयनराजेंनी त्याच मागणीचा रायगडावरुन पुनरुच्चार केला... मात्र शाहांनी मौन बाळगल्याने उदयनराजेंच्या मागण्या केंद्रीय पातळीवर मान्य केल्या जाणार की त्याकडेही दुर्लक्ष केलं जाणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com