National Herald Money Laundering Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; AJLची मालमत्ता घेणार ताब्यात

National Herald Money Laundering Case Update : ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या जप्त केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ED NEWS
ED Raid Business Standard
Published On

नॅशनल हेराल्ड मनी लॉंड्रिग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने AJLची जप्त केलेली संपत्ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ईडीने ११ एप्रिल रोजी मुंबई, दिल्ली आणि लखनौ येथील मालमत्ता निबंधकाला नोटीस पाठवली आहे. या व्यतिरिक्त हेराल्ड हाऊसच्या जिंदल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडलाही नोटीस पाठवली आहे.

ईडीच्या तपासात ९८८ कोटींचा काळा पैसा कमावल्याचं उघड झालं. यामुळे २० नोव्हेंबर २०२३ रोजी एलजेएलची संपत्ती आणि शेअर जप्त करण्यात आले होते. याची एकूण किंमत ७५१ कोटी रुपये आहे. या कारवाईला कोर्टाकडून १० एप्रिल २०२४ रोजी मंजुरी मिळाली.

ED NEWS
Viral Video : ती किंचाळली अन् त्याचा प्लान फसला; गर्लफ्रेंडला सुटकेसमधून हॉस्टेलवर नेताना बॉयफ्रेंड अडकला, नेमकं काय घडलं?

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक तक्रार केली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या साथिदारांनी फक्त ५० लाख रुपये देऊन एजीएलची २००० कोटींची संपत्ती हडपल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणातील तपासात बनावट देणग्या, खोटे भाडे आणि बनावट जाहिरातीच्या नावाखाली ८५ कोटींहून अधिक रुपयांची अफरातफर झाल्याचं उघड झालं होतं. आता हीच संपत्ती ताब्यात घेण्यासाठी नोटीस धाडली आहे. ईडीने संपत्ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

ED NEWS
Solapur Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींपर्यंत विषय जाणार

ईडीच्या तपासात मोठा खुलासा

मीडिया रिपोर्टनुसार, एजेएल-यंग इंडियन नेटवर्कच्या कथित स्वरुपात खोट्या देणग्या १८ कोटी रुपये, आगाऊ भाडे ३८ कोटी रुपये, जाहिरातीसाठी २९ कोटी रुपयांचा वापर करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या मालमत्तेचा वापर रोखण्यासाठी नव्याने पाऊल उचलण्यात आलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com