Bachchu Kadu  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बच्चू कडूंनी डाव टाकला; जुलै महिन्यात नारळ फोडणार, निवडणुकीचा पेच वाढला

Teachers Are My Leaders: विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला होता मात्र ते आता शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Omkar Sonawane

प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची सध्या चर्चा आहे. ते विविध जिल्ह्यात शिक्षक संघटनांची चर्चा करत आहे. आज वर्धा येथे त्यांनी शिक्षक संघटनांची चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी शिक्षक मतदारसंघातील पंधरा ते वीस हजार शिक्षक मतदारांची भेट घेतल्यावर जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला होता. यानंतर कडू यांनी पराभव झाला असून देखील त्यांनी त्यांची लढाई सुरू ठेवली. दिव्यांगासाठीचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या काही समस्या असतील तर कडू हे आक्रमक होताना दिसत होते. काही दिवसांपूर्वी देखील कडू यांनी कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर येथील निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर काही दिवसांनी बच्चू कडू यांनी मंत्री कोकाटे यांची भेट शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते.

अवघ्या काही मतांनी बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर एका सभेत बच्चू कडू यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. आता आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, शिक्षक मतदारसंघात उभं रहावं असं काही शिक्षक संघटनेचा मला आग्रह आहे. परंतु उभं राहण्यापूर्वी सगळ्या शिक्षकांचा किमान 15 ते 20 हजार शिक्षकांचे ज्यांचे मतदान आहे. त्यांना घरोघरी जाऊन विचारणार आहे. कारण माझं कोणी नेता नाही आणि आमची कोणती पार्टी नाहीये म्हणून शिक्षकच आमच्यासाठी नेता आहे. म्हणून त्यांना घेऊन उभं राहावं की नाही हे जाणून घेताय आणि त्यानंतर जुलै महिन्यात आम्ही निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितले.

शिक्षण हे काळाची गरज आहे हे गरिबांपासून दूर गेलं नाही पाहिजे याच्यामुळे शिक्षक संघटना काम करते आहे आणि वर्धेत अजय भोयर हे चांगले कार्यकर्ता आहे ते शिक्षकांचे प्रश्न पोट तिडकीने मांडतात त्याच्यामुळे मी आलो आहे असंही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होणार, आकडेवारी सांगतेय कोण किती पाण्यात?

Wednesday Horoscope: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या राशीवर देवीचा विशेष आशीर्वाद; वाचा उद्याचे भविष्य

ED Raid : आपच्या महत्वाच्या नेत्याला मोठा धक्का! कोट्यवधींची मालमत्ता जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई होणार?

71st National Film Awards: या कलाकारांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन्मान, वाचा सविस्तर यादी

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर शहरात नशेखोराची गुंडगिरी; कोयता दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT