Samruddhi Highway : समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळेना; १६ दिवसांपासून शेतकऱ्याचे धरणे आंदोलन

Jalna News : मोबदला मिळावा यासाठी मागील १६ दिवसांपासून त्यांनी देवमूर्ती गावातच ज्या ठिकाणावरून हा महामार्ग गेला. त्या ठिकाणी एकत्र येत धरणे आंदोलनाला सुरुवात केली १६ दिवसांपासून आंदोलन सुरु
Samruddhi Highway
Samruddhi HighwaySaam tv
Published On

अक्षय शिंदे  
जालना
: मुंबई- नागपूर असा बनविण्यात आलेला समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. दरम्यान जालना- नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा; यासाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागील १६ दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून अद्याप याची दाखल घेण्यात आलेली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 

मुंबई- नागपूर अशा तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचे काम अद्याप काही ठिकाणी सुरु आहे. यातील पहिल्या टप्पाचे काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी काम अद्याप सुरु आहे. मात्र यासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन केले जात आहे. अशाच प्रकारे प्रस्तावित जालना- नांदेड दरम्यानच्या समृद्धी महामार्गात जालना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात येत आहेत. 

Samruddhi Highway
Pachora News : गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेला; म्हशींना बाहेर काढताना डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

गावातच १६ दिवसांपासून आंदोलन 

जालना जिल्ह्यातील देवमूर्ती या गावातील जमिनी गेल्या. परंतु या जमिनीच्या भूसंपादनाला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. योग्य मोबदला मिळावा यासाठी मागील १६ दिवसांपासून त्यांनी देवमूर्ती गावातच ज्या ठिकाणावरून हा महामार्ग गेला. त्या ठिकाणी एकत्र येत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. १६ दिवसांपासून आंदोलन सुरु असताना याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. 

Samruddhi Highway
Jalgaon : बनावट सही- शिक्क्यांद्वारे तयार केले नियुक्तीपत्र; भुसावळ येथील तरुणावर गुन्हा दाखल

तर एक इंच देखील जागा देणार नाही 

दरम्यान आज शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही; तर समृद्धी महामार्गाचे एक इंच ही काम होऊ देणार नाही; असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सरकारला दिला आहे. तर यावेळी शेतकऱ्यांनी देखील आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com