Solapur fire : सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव, ८ जणांचा मृत्यू, कुटुंबाचाही गुदमरून मृत्यू

Solapur fire Breaking News : सोलापुरातील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या कारखान्यात काम करणाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.
Solapur fire News
Solapur fire Saam tv
Published On

Solapur MIDC fire News : सोलापुरातील अक्क्लकोटच्या एमआयडीसी रोडमधील सेंट्रल कारखान्यात रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत कारखान्यातील ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. कारखान्यातील ८ जणांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. कामगारांच्या मृत्यूने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

Solapur fire News
Thane : नाशिकला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील ९ दिवस ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्ग काय?

सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी रोडमधील टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत तब्बल ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या कारखान्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, कारखान्यातील ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कारखान्याला पहाटे लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. आता मृतांच्या आकड्यात वाढ झाली.

Solapur fire News
Shivraj Divate News : घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठिशी; मनोज जरांगेंनी दिला शिवराज दिवटेला धीर

सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक देखील कारखान्यात अडकले होते. त्यांनाही शोधण्याचं कार्य सुरु करण्यात आलं. कारखान्यातील ५ जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. या पाच जणांन दुर्दैवाने कारखान्याच्या बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून आणि होरपळून जागीच मृत्यू झाला.

Solapur fire News
Maharashtra Politics : पवार-ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र? रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांच मनोमिलन होणार? पाहा स्पेशल व्हिडिओ

सर्व आठही मृतदेह सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा अंत झाला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची विनंती सरकारला करण्यात आली आहे. या प्रकरणात महापालिकेची यंत्रणा काही प्रमाणात कमी पडल्याचा आरोप करण्यात आहे. आग विझविण्यासाठी वेळोवेळी पाणी कमी पडत होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून खासगी टँकरद्वारे पाणी मागून घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com