Solapur Fire : सोलापूर MIDC मधील टॉवेल कारखान्याला भीषण आग, कंपनीच्या मालकासह नातेवाइकही अडकले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Solapur MIDC Towel Factory Fire : एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचं काम केलं जायचं.
solapur midc towel Factory  fire
solapur midc towel Factory fireSaam Tv News
Published On

सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट MIDC परिसरातील एका कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची घटना घडली. आज रविवारी दुसरा दिवस उजाडल्यानंतरही आग धुमसतच आहे. त्यामुळे आता ही आग विझवण्यासाठी आजुबाजूच्या अग्निशमन केंद्रांवरील बंब याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, काल रात्री अग्निशमन दलाने या कारखान्यातून तीन जणांना बाहेर काढलं आहे. हे तिघेही आगीने होरपळल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले होते. या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही कंपनीच्या आतच अडकून पडले आहेत. आगीची भीषणता पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचं काम केलं जायचं. टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग वेगाने पसरत गेली. या टेक्स्टाईल मिलचे मालक उस्मानभाई मन्सूरी आपल्या कुटुंबीयांसह कारखान्याच्या परिसरातच वास्तव्यास होते. कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे अद्यापही कारखान्यात अडकलेले आहेत. उस्मानभाई मन्सूरी (वय ७८), अनस मन्सूरी (वय २४), शिफा मन्सूरी (वय २३), चिमुकला युसूफ मन्सूरी (वय १ वर्ष) हे चौघेजण अद्याप आत अडकलेले आहेत. मन्सूरी यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल उशीरा आल्याचा आरोप केला. अग्निशमन दल लवकर आले असते तर सगळ्यांचा जीव वाचला असता. अग्निशमन दलाकडे कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती, असेही नातेवाईकांनी म्हटलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

solapur midc towel Factory  fire
अग्नितांडव! चारमिनारजवळच्या इमारतीला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू

साधारण चार वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दलातील गाडी तात्काळ या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. आगीचं स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या त्याशिवाय अक्कलकोट पंढरपूर चिंचवड एमआयडीसी एनटीपीसी या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले आहेत. कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यानं आत जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचण येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

solapur midc towel Factory  fire
Pune News : किल्ला चढताना छातीत तीव्र वेदना, पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचा सिंहगडावर हार्ट ॲटॅकनं मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com