अग्नितांडव! चारमिनारजवळच्या इमारतीला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू

Hyderabad Fire Near Charminar: हैदराबादच्या चारमिनारजवळील गुलझार हाऊस इमारतीला पहाटे आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Hyderabad Fire Near Charminar
Hyderabad Fire Near Charminar
Published On

Hyderabad Fire : हैदराबादमध्ये एका इमारातील सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगीमध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेकजण साखरझोपेत असताना आगीची घटना घडली. त्यामुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामन दलाने आगीवर चार तासानंतर नियंत्रण मिळावले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील गुलझार हाऊसजवळील एका इमारतीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चारमिनार जवळच्या या इमारतीमध्ये भाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या प्रमाणात राहणाऱ्यांची संख्या असल्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Hyderabad Fire Near Charminar
Midnight Robbery : सर्व साखरझोपेत, गुरवांच्या घरात दरोडा, १४ तोळ्यावर हात साफ, महिलेचा मृत्यू; कोल्हापूर हादरलं

आगीची माहिती मिळताच पहाटे अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. पण आगीच्या तीव्रतेमुळे आणि धुरामुळे बचावकार्यात अडथळे आले. पण चार ते पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीमध्ये गंभीर भाजलेले आणि दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Hyderabad Fire Near Charminar
Solapur MIDC : सोलापुरात मध्यरात्री मोठी दुर्घटना, एमआयडीसीत कारखाना जळून खाक, ३ जणांचा मृत्यू

आगीच्या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री आणि राज्य भाजपा प्रमुख जी किशन रेड्डी आणि तेलंगानाचे मंत्री पोन्नम प्रभाकर चारमीनार घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांना धीर दिला. दरम्यान, आगीची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तेथील गर्दीवर, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. ही घटना हैदराबादमधील गेल्या काही दिवसांतील दुसरी मोठी आगीची घटना आहे. याआधी १४ मे रोजी बेगम बाजारातही अशीच आगीची घटना घडली होती. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत, तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com