Solapur MIDC : सोलापुरात मध्यरात्री मोठी दुर्घटना, एमआयडीसीत कारखाना जळून खाक, ३ जणांचा मृत्यू

Solapur MIDC Factory : सोलापूर एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्री कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही जण अडकले असल्याची भीती असून, बचाव कार्य सुरू आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Solapur MIDC Fire News
Solapur MIDC Fire NewsSaam TV News
Published On

Solapur MIDC Fire News : मध्यरात्री सोलापूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एमआयडीसीमध्ये कारखान्याला भीषण आगा लागली. या आगीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांना बाहेर काढण्यात आलेय, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जातेय. कारखान्यात आणखी पाच ते सहा जण अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लगली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की, कारखान्याच्या परिसरात धुराचे लोट पसरले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाने आगीतून तीन जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार, या आगीमध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Solapur MIDC Fire News
Mumbai-Thane : घोडबंदरच्या ट्रॅफिकला बाय बाय, मुंबई-ठाणे आणखी जवळ, अंतर २५ मिनिटांनी कमी

आगीची दाहकता पाहता अक्कलकोट आणि पंढरपूर परिसरातून अग्निशमन दलाच्या गाड्यांना सोलापुरात पाचारण करण्यात आलं आहे. कारखान्यात ५ ते ६ जण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी अग्निशमन दलाची मोठी टीम कार्यरत आहे. याशिवाय, पोलिसांचा मोठा बंदोबस्तही घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शॉर्ट सर्किट किंवा रासायनिक पदार्थांमुळे आग भडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा घटनेची चौकशी करत आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा आणि इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Solapur MIDC Fire News
विद्यार्थ्याला शिक्षकाने चापट मारली, कान-तोंडातून रक्त आले, ४ वर्षाच्या चिमुकल्याचा भयंकर मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com