Viral Video: १५ सेकंदात टँकर रस्त्यावर आडवा, ओव्हरटेक करताना गंडला अन् ३ वेळा उलटला, अपघाताचा एकदम फिल्मी व्हिडिओ

Shocking Accident Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा तुम्हाला अनेक अपघाताच्या घटना पाहण्यासाठी मिळतात. काही अपघात कसे घडले त्याचेही व्हिडिओ असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच आहे.
Shocking Accident Video
Viral VideoSaam Tv
Published On

Bengaluru Video: शहरातील वाहतूक कोंडी, भरधाव वेगात धावणारी वाहने आणि त्यातून होणारे अपघात हे आता रोजचेच चित्र बनले आहे. सध्या अशाच एका धक्कादायक अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेला एक पाण्याचा टँकर वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा होत असताना दिसत आहे. प्रत्येक वाहन चालक योग्यरित्या वाहन चालवत असतो. तितक्यात एक पाण्याचा टँकर येतो आणि त्याचे नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या कडेला पलटला जातो. या घटनेत कार चालक थोडक्यात बचावला जातो आणि संपूर्ण थरार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच फेसबूक आणि अन्य सोशल मीडिया माध्यंवारही शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक अशा अपघातांचे व्हिडिओ काही क्षणात जगभर पसरले जातात.

अपघाताचा (Accident) हा व्हिडिओ लाखोंच्या संख्येने पाहिला गेला आहे. तर अनेक प्रतिक्रिया ही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पुढचा कारवाला थोडक्यात बचावला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कायम असे अपघातात पाहून भिती वाटते रस्त्याने जायची'' अशा प्रकारे अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Shocking Accident Video
Shocking Accident: आधी कारनं उडवलं, मग ट्रकनं चिरडलं; तरीही तरुण उठून पळाला, VIDEO पाहून चक्रावून जाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com