Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारत फासले शेण; ठाकरे गटाकडून जालना, बीडमध्ये आंदोलन

Jalna Beed News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSaam tv
Published On

अक्षय शिंदे/ योगेश काशीद 
जालना/ बीड
: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. यातच आज जालना व बीडमध्ये आंदोलन करत कोकाटे यांच्या फोटोला जोडे व शेण मारण्यात आले. तसेच राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. 

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात आले असून बीड आणि जालन्यात ठाकरे गटाने कृषिमंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

Manikrao Kokate
Sangamner Crime : संगमनेरमध्ये खळबळ! उपचारासाठी दाखल मुलीवर अत्याचार; डॉक्टर ताब्यात,नातेवाईक व रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये झटापट

सरकारने राजीनामा घ्यावा 

जालन्यात देखील ठाकरे गट आक्रमक झाला असून जालना शहरातील गांधी चमन येथे कृषी मंत्री कोकाटे यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. दरम्यान शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा सरकारने राजीनामा घ्यावा; अशी मागणी यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

Manikrao Kokate
Muktainagar Accident : भरधाव मालवाहू गाडीचे टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू, पाचजण जखमी

बीडमध्ये प्रतिमेला शेण मारत आंदोलन
बीड
: कृषिमंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी विरोधात आंदोलन चालू आहे. यामध्ये बीडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कृषिमंत्र्यांच्या फोटोला शेण फासून पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल वक्तव्य विरोधात घोषणाबाजी करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com