Muktainagar Accident : भरधाव मालवाहू गाडीचे टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू, पाचजण जखमी

Jalgaon News : मध्यप्रदेशातील असलेल्या वाहनातून तूर घेऊन मालकापूरच्या दिशेने निघाली होती. यामध्ये मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले काहीजण या गाडीमध्ये बसून जळगावला येण्यासाठी बसले होते
Muktainagar Accident
Muktainagar AccidentSaam tv
Published On

मुक्ताईनगर (जळगाव) : शेतकऱ्याने काढणी केली तूर विक्रीसाठी मार्केटमध्ये नेण्यासाठी मालवाहू गाडीमध्ये टाकून नेण्यात येत होता. यावेळी पिकअप गाडीचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. सदरची घटना मुक्ताईनगर ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर ५ एप्रिलला घडला. या अपघातात महामार्गावर तुरीचे पोते पडल्याने शेतकऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. 

मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या या अपघातात बानिया सबला बारेला (वय ४०) याचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील असलेल्या वाहनातून तूर घेऊन मालकापूरच्या दिशेने निघाली होती. यामध्ये मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले काहीजण या गाडीमध्ये बसून जळगावला येण्यासाठी बसले होते. मात्र सदरची गाडी मुक्ताईनगर- मलकापूर महामार्गावरून येत असताना गाडीचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली. 

Muktainagar Accident
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्प खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट; ठेकेदारांकडून नियमांची पायमल्ली

एकाचा जागीच मृत्यू 

गाडीमध्ये भरलेल्या तुरीच्या पोत्यांवर गुड्या वरजू बारेला, प्रेमसिंग मेलदार बारेला, बानिया बारेला, दावीबाणी बारेला, रामसिंग सुभाष ऊर्फ सबला बारेला हे बसले होते. वाहनाचे टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन बानिया सबला बारेला (वय ४०) याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले आहेत. 

Muktainagar Accident
Sangamner Crime : संगमनेरमध्ये खळबळ! उपचारासाठी दाखल मुलीवर अत्याचार; डॉक्टर ताब्यात,नातेवाईक व रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये झटापट

जखमींना रुग्णालयात केले दाखल 

अपघातात गुम वरजू बारेला, प्रेमसिंग मिलदार बारेला, दावी बानिया बारेला, पुतण्या शिकास ठाकूर राव, महेश रामलाल बारेला यांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लागलीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी मृतांचा भाऊ रामसिंग सुभाष ऊर्फ सबला बारेला याने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com