Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्प खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट; ठेकेदारांकडून नियमांची पायमल्ली

Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू हा हरित पट्टा आहे. यामुळे या भागात खोदकाम करताना भूसुरंग स्फोट करण्यास शासनाकडून बंदी करण्यात आली आहे. असे असले तरी या परिसरात खोदकाम करण्यासाठी भूसुरुंग लावले जात आहेत
Bullet Train Project
Bullet Train ProjectSaam tv
Published On

पालघर : देशाच्या महत्त्वाकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सदरचे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात डहाणू सारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्याने परिसरातील अनेक घर धोकादायक बनली आहेत. 

देशांतर्गत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरु आहे. सदरचे काम पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीला सुरु असून याठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातील डहाणू हा हरित पट्टा आहे. यामुळे या भागात खोदकाम करताना भूसुरंग स्फोट करण्यास शासनाकडून बंदी करण्यात आली आहे. असे असले तरी या परिसरात खोदकाम करण्यासाठी भूसुरुंग लावले जात आहेत. यामुळे परिसरात धोका निर्माण होत आहे. 

Bullet Train Project
Shocking Video: महिला डब्ब्यात तरुणाचं असभ्य वर्तन, मुंबई लोकलमधील व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

स्फोटामुळे घरांना पडले तडे  

डहाणूच्या गोवने परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केल्याने परिसरातील अनेक घरांना तडे जाऊ लागले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या घरांना वारंवार हादरा बसून भिंतींना तडे गेल्याने येथील अनेक घर सध्या धोकादायक बनली आहेत. अशा पद्धतीने नियमांची पायमल्ली करत ठेकेदाराकडून मनमानी केली जात असल्याचे बोलले जात आहे. 

Bullet Train Project
St Bus : आता खराब रस्ता असलेल्या गावांत बस सेवा होणार बंद; एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सध्या येथील अनेक घर वारंवार होणाऱ्या भूसुरंग स्फोटांमुळे धोकादायक झाली असून या घरांमध्ये येथील कुटुंब भीतीच्या छायेखाली आपला मुठीत घेऊन राहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com