St Bus : आता खराब रस्ता असलेल्या गावांत बस सेवा होणार बंद; एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

Akola News : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची ओळख आहे. मात्र आता महामंडळाने देखील महत्वपूर्ण निर्णय घेतला असून खराब रास्ता असल्यास गावातील बससेवा बंद करण्यात येणार
St Bus
St BusSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी या प्रमाणे गावागावात बससेवा पोहचली आहे. यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची ओळख आहे. मात्र आता महामंडळाने देखील महत्वपूर्ण निर्णय घेतला असून खराब रास्ता असल्यास गावातील बससेवा बंद करण्यात येणार आहे. यामुळे खराब रस्त्यांमुळे विद्यार्थी व गावातील प्रवाशांचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. 

अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराळे ग्रामपंचायतला अकोला एसटी आगाराने पत्र देत एसटी बस फेऱ्या रद्द करण्याबाबत  कळवले आहे. अकोल्यातल्या धामणा ते हातरून या १० किमी अंतराचा पूर्णतः खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वर्षभरातच एसटी बसचे मोठं नुकसान होत आहे. तसेच या खड्डेमय रस्त्यांवरून धावताना अपघाताचीही भीती देखील जास्त राहते. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. यासाठीच अकोला 'एसटी डेपो'ने मोठं पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. 

St Bus
Amravati Crime : पेट्रोल पंपावरील दरोड्याचे धक्कादायक सत्य आले समोर; पोलिसांकडून तीन तासांत उलगडा, पाच जणांना अटक

ग्रामपंचायतींना पत्र 
अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराळे या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या गावातील बससेवा बंद होण्याची शक्यता आहे. बस सेवा बंद करण्याचा इशाराही अकोला एसटी डेपोने दोन्ही ग्रामपंचायतीला अर्थातचं गावांना दिला आहे. गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू, असा पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आले. त्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यांसह ग्रामपंचायतीला मोठा धक्का बसला आहे. 

St Bus
Chilli Price : शेतकऱ्यांना मिरचीने रडवलं; महिनाभरापासून दर घसरले, किरकोळ दराने होतेय विक्री

विद्यार्थ्यांनाच होणार त्रास 

अकोला ते धामणा रस्त्यावर दिवसभरात तीन वेळा बस फेऱ्या सुरु आहेत. या मार्गावरील प्रवास हा जवळपास पाऊण तासाचा आहे. परंतु खड्डेमय रस्त्यांमुळे तासावर हा प्रवास गेला आहे. तसंच खराब रस्त्यामुळे एसटीचं मोठ नुकसान आणि वाहन चालवताना त्रास होत असल्याचं एसटी चालक सांगत आहेत. मात्र महामंडळ बस बंद करण्याच्या निर्णयावर आल्याने गावाची बस सेवा बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बस सेवा रद्द करण्याबाबतचा विचार मागे घ्यावा, असा आग्रह आता गावकरी धरत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com