Chilli Price : शेतकऱ्यांना मिरचीने रडवलं; महिनाभरापासून दर घसरले, किरकोळ दराने होतेय विक्री

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मिरचीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी मिरचीचे पीक चांगले होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती
Chilli Price
Chilli PriceSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: शेतातून मिळणाऱ्या उत्पादनात शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागत आहे. शिवाय बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाला देखील भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. अशाच प्रकारे मिरची उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. मार्केटमध्ये चांगला दर मिळत नसल्याने किरकोळ दराने मिरचीची विक्री करण्याची वेळ आली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मिरचीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी मिरचीचे पीक चांगले होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांच्या या आशेला विराम देत यंदाही मिरची उत्पादनामुळे त्यांना निराशा सहन करावी लागली आहे. मोहाडी तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर काही शेतकरी उन्हाळी पीक म्हणून हिरव्या मिरचीची लागवड करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. 

Chilli Price
Ratnagiri Water Crisis : रत्नागिरीत पाणीटंचाईची दाहकता; अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा

मार्च महिन्यात दरात घसरण 

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. मिरचीचा सात ते आठ रुपये प्रतिकिलो इतका खाली भाव गेला. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे मिरची तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरीसुद्धा शेतकऱ्यांना त्याच्या खिशातून द्यावी लागली. अर्थात या ठिकाणी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

Chilli Price
Heat Wave : तापमानाचा पारा पुन्हा वाढला; धुळ्यात यंदाच्या सार्वधिक तापमानाची नोंद

अजूनही दरवाढ नाही 

मात्र शेतकऱ्यांना अपेक्षा होती कि काही दिवसांनी मिरचीचे भाव वाढतील. पण अद्यापही किमतीत वाढ झाली नाही. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य पारितोषिक मिळत नाही. चांगल्या भावाची आशा असताना, मिरचीने यंदाही शेतकऱ्यांना रडविले आहे. चांगला भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची झळ सहन करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com