Ratnagiri Water Crisis : रत्नागिरीत पाणीटंचाईची दाहकता; अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा

Ratnagiri News : राज्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात पाण्याची समस्या गडद होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना पायपीट करत पाण्याची तहान भागवावी लागत आहे
Ratnagiri Water Crisis
Ratnagiri Water CrisisSaam tv
Published On

रत्नागिरी : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जनविण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची दाहकता आता वाढण्यास सुरवात झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी काही गावांमध्ये आतापासूनच ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येऊ लागला आहे. 

राज्यातील पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात पाण्याची समस्या गडद होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना पायपीट करत पाण्याची तहान भागवावी लागत आहे. तर काही ठिकाणी पाण्याची भीषणता दूर करण्यासाठी ट्रॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात हि दाहकता आणि टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

Ratnagiri Water Crisis
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार ११ एप्रिल पहाटे होणार बंद; चैन पोर्णिमा यात्रेनिमित्त मंदीर संस्थानचा निर्णय

२५ वाड्यांना ट्रॅकरद्वारे पाणी 

पाणी पातळीत सध्या मोठ्या प्रमाणात घट झालेली पहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम पाणी पातळीवर झाला असून जलस्रोत आटू लागले आहेत. काही ठिकाणी विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या ५ गावांमधील २५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरु आहे. प्रशासनाकडून ५ टँकरने या गावांना पाणीपुरवठा सुरु आहे.

Ratnagiri Water Crisis
Raigad : काम अर्धवट ठेवत बिल्डरकडून फसवणूक; नेरळ पोलिसांकडून ठाण्यातील बड्या बिल्डरला अटक

मे महिन्यात अधिक भीषणता 

रत्नागितल्या सोमेश्वर गावात पहिला टँकर सुरु करण्यात आला आहे. यामुळे आतापासूनच गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावं लागत आहे. सोमेश्वरमध्ये पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पाऊस पडेपर्यंत अनेक ठिकाणी काटकसरीने पाणी वापरावं लागणार आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com