सचिन कदम
रायगड : नेरळमध्ये विजय इस्टेट या नावाने सदनिका बांधल्या जात होत्या. त्या प्रकल्पातील अनेक इमारतींचे काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे या प्रकल्पातील सदनिका धारक मानखुर्द येथील गजानन कागलकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर रेरा न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विजय इस्टेटचे मालक अतीव गाला यांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.
रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील विजय इस्टेटच्या माध्यमातुन कर्जत तालुक्यातील वाकस गावाच्या हद्दीत शंभर एकर जमिनीवर गृह निर्माण सोसायटी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र गेली सात आठ वर्षे झाली तेथील बांधकाम ठप्प झाले आहे. सोसायटीचे बांधकाम होत असल्याने अनेकांनी येथे घरांचे बुकिंग केले होते. यासाठी काही रक्कम देखील दिली होती. मात्र काम बंद पडल्याने घर घेणार्यांनी बिल्डरला विचारणा केली.
एकाकडून पोलिसात तक्रार
दरम्यान सात वर्षांपासून बांधकाम बंद असल्याने या प्रकल्पमध्ये सदनिका बुक करणारे गजानन कागलकर (रा. मानखुर्द) यांनी विजय इस्टेट विरोधात फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अतीव गाला यांच्यावर भारतीय दंड संहिता ४२० आणि ४०६ तसेच भारतीय फ्लॅट अधिनियमाप्रमाणे २०२१ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात हि कारवाई करण्यात आली आहे.
अखेर बिल्डरला घेतले ताब्यात
कर्जत तालुक्यातील वाकस गावाच्या हद्दीत शंभर एकर जमिनीवर मोठा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने याठिकाणी अनेकांनी बुकिंग केले होते. परंतु काम अर्धवट ठेवत फसवणूक केल्याचा प्रकार झाला आहे. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर नेरळ पोलिसांनी बिल्डरचा शोध घेत ठाण्यातील बड्या बिल्डर असलेल्या अतीव गाला यास रायगडच्या नेरळमध्ये अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.