Tuljabhavani Mandir
Tuljabhavani MandirSaam tv

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार ११ एप्रिल पहाटे होणार बंद; चैन पोर्णिमा यात्रेनिमित्त मंदीर संस्थानचा निर्णय

Dharashiv News : तुळजाभवानी मातेची चैत्र पोर्णिमा याञा ११ ते १५ एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते
Published on

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: चैत्र नवरात्रोत्सव सुरु आहे. यात तुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महाद्वार ११ एप्रिलला पहाटे भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी अन्य मार्गाचा वापर केला जाणार आहे. यात्रोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे. 

चैत्र नवरात्रोत्सव उत्सव सध्या सुरु आहे. दरम्यान तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची चैत्र पोर्णिमा याञा ११ ते १५ एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यात्रेत राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगनातील भाविक वर्षाचा खेटा पुर्ण करण्यासाठी येत असतात. यामुळे पाच दिवसांच्या उत्सवात प्रचंड गर्दी होत असते. 

Tuljabhavani Mandir
Electric Shock : डीपी दुरुस्तीचे काम करताना विजेचा झटका; युवकाचा मृत्यू, ग्रामस्थ आक्रमक

पाच दिवस महाद्वार राहणार बंद 

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीत मंदिराचे मुख्य महाद्वारमधून भाविकांची गर्दी अधिक होऊ शकते. यामुळे शुक्रवारी म्हणजे ११ एप्रिलला पहाटे तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत संपूर्ण पाच दिवस मंदिराचे हे महाद्वार बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. 

Tuljabhavani Mandir
Satara Crime : बुरखा परिधान करून मंगळसूत्र तोडून पसार; दोन्ही चोरटे ताब्यात

भाविकांसाठी पर्यायी मार्ग 

यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन घेण्यासाठी ११ ते १५ एप्रिल दरम्यान महाद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. या ऐवजी भाविकांना बिडकर पायऱ्यांवरुन मंदीरात सोडण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजन करत भाविकांना सुलभ व चांगले दर्शन घेता येणे शक्य होईल; यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान १२ एप्रिलला मंदीरात पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यामुळे यादिवशी अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com