Heat Wave : तापमानाचा पारा पुन्हा वाढला; धुळ्यात यंदाच्या सार्वधिक तापमानाची नोंद

Dhule News : धुळे जिल्ह्यात देखील दोन दिवस अधून मधून पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता धुळ्याच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आज उच्चांकी तापमानाची नोंद धुळे शहरात करण्यात आली
Dhule Temperature
Dhule TemperatureSaam tv
Published On

धुळे : साधारण आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने तापमानात घसरण झाली होती. तर चाळीस अंशापर्यंत पोहचलेले तापमान ३५ अंशापर्यत खाली गेले होते. मात्र आता यात पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली असनू धुळ्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस इतक्या उचांकी तापमानाची नोंद आज धुळ्यात करण्यात आली आहे. त्यानुसार जळगावमध्ये देखील तापमान ४० अंशापर्यंत पोहचले आहे. 

मागील चार- पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. धुळे जिल्ह्यात देखील दोन दिवस अधून मधून पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता धुळ्याच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तर आज उच्चांकी तापमानाची नोंद धुळे शहरात करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास तीव्र झळा जाणवत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहण्यास मिळाला.   

Dhule Temperature
Amravati Crime : पेट्रोल पंपावरील दरोड्याचे धक्कादायक सत्य आले समोर; पोलिसांकडून तीन तासांत उलगडा, पाच जणांना अटक

आणखी तापमान वाढीची शक्यता 

धुळेकरांना प्रचंड वाढलेल्या उन्हाच्या झळा आता सोसाव्या लागत आहेत. तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे धुळेकर नागरिक घराबाहेर न पडणे पसंत करत आहेत. यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. शिवाय आता यापुढे देखील तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Dhule Temperature
Beed : दुर्दैवी घटनांनी गावात खळबळ; एकाच दिवशी दोन युवकांचा मृत्यू

जळगावंही तापले 

राज्यात सर्वाधिक तापमान असलेल्या जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला आहे. आतापर्यंत ३५ ते ३७ अंशावर असलेले तापमान आज ४० अंशापर्यंत पोहचले आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून अगदी सकाळी अकरा वाजेपासूनच अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव जळगावकरांना अनुभवण्यास मिळाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com