Beed : दुर्दैवी घटनांनी गावात खळबळ; एकाच दिवशी दोन युवकांचा मृत्यू

Beed News : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला असून या घटनांनी गावात खळबळ उडाली आहे. यात एका घटनेत एकाने आत्महत्या केली. तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असताना बुडाला
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्ह्यातील धावडी गावात एकाच दिवशी दोन दुर्दैवी घटना घडल्या आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला असून या घटनांनी गावात खळबळ उडाली आहे. यात एका घटनेत एकाने आत्महत्या केली. तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असताना बुडाला असून गावकरी शोध घेत आहेत.

बीड जिल्ह्याच्या धावडी गावात या घटना ५ एप्रिलला घडल्या आहेत. या घटनांमुळे गावात चूल देखील पेटली नाही. यातील अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रिंगरोड जवळील शेतामध्ये एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रामधन उर्फ करण अशोकराव नेहरकर (वय २५, रा. धावडी, ता. अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने एका ढाब्याच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.

Beed News
Amravati Crime : पेट्रोल पंपावरील दरोड्याचे धक्कादायक सत्य आले समोर; पोलिसांकडून तीन तासांत उलगडा, पाच जणांना अटक

पोहायला गेला तो परतलाच नाही 

सुटी असल्याने गावापासून जवळच असलेल्या तलावावर मित्र मित्र दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. धावडी येथील चौघे मित्र केंद्रेवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अंकुर राजाभाऊ तरकसे (वय १८) हा खोल पाण्यात गेल्याने तो परत वर आलाच नाही. मित्रांनी त्याचा शोध घेतला असता सापडून आला नाही. 

Beed News
Manikrao Kokate : शेतकऱ्यांबाबत अपमानजनक वक्तव्य; कृषीमंत्री कोकाटेंच्या विरोधात आंदोलन; प्रतिमेला मारले जोडे

२४ तासानंतरही सापडला नाही 

घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी अंकुर बुडाल्याची माहिती गावात सांगितली. यानंतर ग्रामस्थ तलावावर गेले. यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र मृतदेह आढळून आला नाही. रात्री उशीर झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले असून २४ तास उलटून गेले तरी आणखी शोध लागला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com