
Shocking Viral News: मायानगरी म्हणून ओळखली जाणारे मुंबई शहर हे लोकल ट्रेनसाठी जगभर प्रसिद्ध आहे. दररोज अनेक प्रवासी या लोकलवर अवलंबून असतात. हीच लोकल ट्रेन अनेकांसाठी जीवनरेखा ठरते. मात्र, आता लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षित आहेत का, हा एक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
सध्या अलीकडेच घडलेल्या एका प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. मुंबई लोकल (Local Train) ट्रेनमध्ये असलेल्या महिलांच्या डब्ब्यात एका तरुणाने घुसत काही महिला प्रवाशांची गैरवर्तण केल्यची घटना समोर आली आहे. हा घडलेला प्रकार इतका धक्कादायक असतो की, काही महिला प्रवाशी घाबरल्या गेल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण लोकलमधील महिल्यांच्या डब्ब्यात घुसलेला दिसत आहे. धक्कादायक म्हणजे महिलांशी अपशब्दात आरेरावी करत बोलत आहेत. त्यातील एक महिला त्या तरुणाला प्रतिउत्तर देत आहे. घडलेला हा प्रकार त्याच डब्ब्यातील एका प्रवासी महिलेने मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होताच अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''महिलांनी मिळून मारायला पाहिजे होता'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''असे प्रकार का थांबत नाहीत'' अशा अनेक संतापजन प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.