Ajit Pawar-Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar-Sharad Pawar: अजितदादा- शरद पवार पुन्हा एकत्र येणार? काका-पुतण्याच्या 'त्या' एका कृतीने चर्चांना उधाण

Ajit Pawar-Sharad Pawar: जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. यावेळी शरद पवार आणि अजित पवारदेखील एकत्र दिसले. दरम्यान, यानंतर काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का असे प्रश्न विचारले जात आहे.

Bharat Mohalkar

निवडणूकीत टोकाची कटुता आलेलं पवार कुटुंब एकत्र आलंय... त्याला कारण ठरलंय जय पवारांचा साखरपुडा.... या सोहळ्यात कोण कोण सहभागी झालं? आणि पुन्हा पवार कुटुंब एकत्र येणार का?

पवार कुटुंब एकसाथ

जय पवार यांचा साखरपुडा झाला. अजित पवारांच्या पुण्यातील घोटावडे येथील फार्महाउसवर हा साखरपुडा झाला. या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं... आणि त्याला कारण ठरलंय... उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवारांचा साखरपुडा....या कौटुंबिक सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रतापराव पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं.आणि सुप्रिया सुळेंनीही हे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले.

एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीतील कटुता विसरुन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनीही गप्पा मारल्याचं समोर आलंय.मात्र पवार राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्याच दिवाळीला एकत्र आलेले काका-पुतण्या लोकसभा निवडणुकीआधीच्या दिवाळीला एकत्र आलेच नाहीत.यावेळी उलट अजित पवारांनी बारामतीत दिवाळीचा वेगळा कार्यक्रम घेतला.त्यामुळे पवार कुटुंबात टोकाचे मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. मात्र निवडणूका संपल्या आणि पवार कुटुंबातील कटुता संपण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे... त्याला कारण ठरलंय पवार काका-पुतण्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी..

काका-पुतण्या भेटी-गाठी

12 डिसेंबर 2024

वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र

23 जानेवारी 2025

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा

27 जानेवारी 2025

तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन

22 मार्च 2025

अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र.

या भेटीगाठी होत असल्या तरीही हा राजकीय कार्यक्रम नसून कौटूंबिक कार्यक्रम असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय....

पवार कुटुंबाचं एकत्रित येणं हे फक्त कौटूंबिक सोहळ्यापुरतं मर्यादित राहील की यातून आगामी काळात काही नवं राजकीय समीकरण साधलं जाईल? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT