उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते.
पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा सोहळा संपल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीयांचा ग्रुप फोटो काढण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.