
राष्ट्रवादीच्या फुटीला दीड वर्ष झालंय, पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाही. त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये अण्णा बनसोडेंच्या सत्कार समारंभात शरद पवारांचा दैवत असा केलेला उल्लेख. त्यामुळे अजित पवार एका दगडात दोन पक्षी तर मारत नाहीत ना या चर्चांनी जोर धरलाय.
2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पवार कुटुंब आमने-सामने आलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचे सूर बदललेत. त्यांनी बीडमधील सभेतही चुलत्यांच्या कृपेने सगळं काही ठीक असल्याचं सांगितलं. तर हाच धागा पकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही अजित पवारांना टोला लगावलाय.
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमधील जवळीक वाढत चाललीय.
12 डिसेंबर 2024
वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट
23 जानेवारी 2025
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा
27 जानेवारी 2025
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन
22 मार्च 2025
अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र
अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा होणार आहे.. त्याआधीच अजित पवारांनी टायमिंग साधलंय. एवढंच नाही तर शरद पवारांचा दैवत असा उल्लेख करतानाच अजित पवारांनी मोदींचाही उदोउदो केलाय. त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत भावनिक तर मोदींचं कौतूक करत राजकीय नातं जपण्याचा प्रयत्न करत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं म्हटलं जातंय. मात्र अजित पवारांचं वक्तव्य काकांच्या प्रेमातून की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या रणनीतीतून? हा प्रश्न कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.