Manikrao Kokate : अजित पवारांचा कडक इशारा, तरीही स्वभाव बदलला नाही; कृषिमंत्री कोकाटे असे का म्हणाले?

Ajit Pawar Latest news : अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना कडक इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर स्वभाव बदलला नसल्याचं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
Manikrao Kokate
Manikrao Kokate News Saam tv
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून कडक शब्दात तंबी दिली. अजित पवारांच्या तंबीनंतरही कोकाटे आपल्या परखड स्वभावावर ठाम राहिले आहेत. अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भूमिका स्पष्ट केली.

'माझा स्वभाव जन्मजात आहे, तो एका दिवसात बदलणार नाही. पण माझा हेतू स्वच्छ आहे, कोणत्याही विधानाच्या आडून काही साध्य करायचा माझा उद्देश नाही, असे कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Manikrao Kokate
Shocking : बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर नराधमाचा कारनामा उघड
Manikrao Kokate
Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कोकणातील आणखी एका नेत्याने सोडली साथ

मागील काही दिवसांपासून कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या वक्तव्यांमुळे वादंग निर्माण झाले होते. शेतकरी कर्जमाफीच्या पैशांचा वापर शेतकऱ्यांनी लग्नकार्यासाठी केल्याचा त्यांचा दावा आणि त्यानंतर आलेल्या टीकेमुळे ते अडचणीत आले होते. या प्रकरणी अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कोकाटे यांना कडाडून फटकारले आणि तिसऱ्यांदा चूक झाली तर मंत्रिपद धोक्यात येईल, असा कठोर इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्यानंतरही कोकाटे यांनी आपला स्वभाव बदलण्यास स्पष्ट नकार देत आपली भूमिका मांडली आहे.

Manikrao Kokate
Clash between Two Group : जालन्यात दोन गटांत तुफान राडा! डोकी फोडली, वाहनांच्या काचा फोडल्या; हॉस्पिटलबाहेर दगडफेक,VIDEO

'मी परखड सत्य बोलतो. माझा स्वभाव कडक असला तरी माझा हेतू शेतकऱ्यांचे भले करण्याचा आहे. नवी पिढी शेती व्यवसायात यावी, कमी खर्चात जास्त उत्पादन काढावे, यासाठी मी काम करत आहे, असे कोकाटे यांनी ठणकावून सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com